बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ‘जळगाव जिल्हा श्री’ 2023 चषक

तरुण भारत लाईव्ह ।१५ जानेवारी २०२३। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘बाळासाहेब ठाकरे चषक’ 19वी ‘जळगाव जिल्हा श्री’ 2023 शरीर सौष्ठव स्पर्धा 23 जानेवारी रोजी आयोजित केली आहे. या स्पर्धेत 120पेक्षा जास्त खेळाडू सहभाग घेणार असल्याची माहिती जळगाव डिस्ट्रीक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिमतर्फे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहन एन.चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सचिव अक्षय चव्हाण, मार्गदर्शक प्रा. हरिशचंद्र सोनवणे, राजेश बिर्‍हाडे उपस्थित होते.

स्पर्धेविषयी पुढे माहिती देताना मोहन चव्हाण म्हणाले, की ‘जळगाव जिल्हा श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. यंदा या स्पर्धेचे 19 वे वर्ष असून ती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेणार आहोत. हा कार्यक्रम येथील दूध फेडरेशन रोडवरील श्री साई बजरंग जिमच्या पटांगणावर सायंकाळी 5 वाजेपासून घेण्यात येणार आहे. यापुढे ही स्पर्धा दरवर्षी 23 जानेवारीला घेतली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण एक लाख एक्कावन्न हजाराच्या बक्षिसांची वाटप होणार आहे. ही स्पर्धा पाच वजनी गटात होणार आहे. प्रत्येक गटातून पाच विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आदी बक्षीस दिले जाणार आहे. तसेच ‘बाळासाहेब ठाकरे चषक’ एका विजेत्याला दिला जाईल. सोबतच बेस्ट पोझर व मोस्ट इम्प्रुव्हड हे विजेतपद देखील दिले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली असून या स्पर्धा नियोजन बद्ध होण्यासाठी विविध समित्याही बनविण्यात आल्याचे सांगितले. यात स्पर्धा आयोजन समिती, बक्षीस वितरण समिती, रंगमंच देखरेख समिती, बक्षीस वितरण सहाय्यक समिती, खेळाडू भोजन देखरेख समिती, टेंट देखरेख समिती, प्रमुख पाहुणे व्यवस्था समितीचा समावेश