---Advertisement---
फैजपूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आमदार अमोल जावळे यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २५६ जणांनी नेत्रतपासणी करून घेतली असून त्यापैकी ५४ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी केली. डॉ. विराम राजपूत, डॉ. श्वेता चोपडे, डॉ. मयुरेश डोंगरे आणि डॉ. कनिष खोब्रागडे यांनी वैद्यकीय सेवा दिली. त्यांना ब्रदर बापू नवाले, टेक्निशियन निशा तपकिरे, आमिर शेख आणि हेल्पर मोहन कसार यांनी सहकार्य केले. याशिवाय नेत्रचिकित्सा अधिकारी मानसी वासुदेव पाटील, तुषार विजय जोशी, गौरव प्रदीप चौधरी आणि ट्विंकल अजय पिसे हेही उपस्थित होते.
शिबिराला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून रुग्णांना आधार दिला. नगराध्यक्षा दामिनीताई पवन सराफ यांच्यासह विलास चौधरी, प्रभाकर सोनवणे, जयश्री नरेंद्र चौधरी, निलिमा राजेंद्र महाजन, दिपाली जितेंद्र भारंब, तसेच नगरसेवक सुरज रमेश गाजरे, सागर हरिचंद्र होले, सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे, विनोद अरुण चौधरी, पवन अनिल सराफ, हकीम एमत तडवी, शेख युसुन शेख अयुब आणि समाजसेवक डॉ. शेख दानिश यांसह इतरांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे समन्वयन मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांनी केले. समाजातील गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी, या हेतूने जयंतीदिनाचे औचित्य साधत हा उपक्रम राबवण्यात आला. निवड झालेल्या रुग्णांवर लवकरच मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून या उपक्रमाबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.









