पीएम विश्वकर्मा योजना: भारतामध्ये अनेक जातीचे लोक राहतात, कुंभार, धोबी, मूर्तिकार, शिल्पकार, यासोबतच कारागिरांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने भारतातील ३० लाख कारागिरांचे नशीब पीएम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल आहे. केंद्रीय सरकारने नवीन विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे.
१३ हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा फायदा देशातील ३० लाख पारंपरिक कारागिरांना होईल.या कारागिरांना सरकारकडून एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे आणि पुढील टप्प्यात दोन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.आणि या योजनेमध्ये व्याजाचे दर पाच टक्के ठरवण्यात आले आहे. विश्वकर्मा योजना ही योजना १३ हजार कोटी रुपयांची आहे.
या योजनेमध्ये या जातीचा समावेश आहे.
शिल्पकार ,लोहार, कुंभार, गवंडी, फुलकाम, धोबी,मासे पकडणारे, कुलुपे, आदींचा समावेश होतो.
दृष्टिक्षेपात विश्वकर्मा योजना
पारंपरिक कारागीर आणि कारागिरांच्या ३० लाख कुटुंबास होणार फायदा
पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८ पारंपरिक उद्योगांचा समावेश
योजनेंतर्गत मूलभूत आणि आधुनिक असे दोन प्रकारचे
आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार
ब्रॅंडिंग, ऑनलाइन मार्केट अॅक्सेस यासारखी मदत केंद्राकडून दिली जाणार
प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाईल
१७ सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीनिमित्त आहे. त्या निमित्ताने ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्यात येईल. तसेच याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. विश्वकर्मा या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कारागिरांना खात्रीची बाजारपेठ मिळू शकेल.