तिसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 घेतले अर्ज

 

जळगाव :  लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी 20 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मनोज गौरीशंकर शर्मा, जळगाव ( अपक्ष)4, ललित गौरीशंकर शर्मा यांनी तेजस्विनी ललित शर्मा जळगाव( अपक्ष) यांच्यासाठी 4, पंकज दत्तात्रय पवार, कन्नड यांनी स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर ( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, अनिल विश्वासराव मोरे, जळगाव यांनी सतीश विश्वासराव मोरे जळगाव (अपक्ष) यांच्यासाठी 4, दिगंबर अशोक सोनवणे जळगाव( अपक्ष)1, किरण उत्तमराव वारुळे अमळनेर यांनी स्मिता उदय वाघ डांगर तालुका अमळनेर( भारतीय जनता पार्टी) यांच्यासाठी 4, नुरेजमील इसाभाई पटेल, जळगाव (अपक्ष )1, राजेंद्र सुभाष खरे, पळासखेडे तालुका जामनेर( बहुजन मुक्ती पार्टी)4, जितेंद्र भागवत केदार जळगाव( अपक्ष)1, दिलीप वसंत मराठे, जळगाव( अपक्ष)1, सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव( अपक्ष)2, धरमपाल हरिभाऊ इंगळे, मलकापूर( बहुजन समाज पार्टी) 2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा यांनी अनिल गंभीर मोरे, बोदवड( अपक्ष) यांच्यासाठी 2 असे एकूण तेरा उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत. त्यात रामेश्वर मनोहर लोहार, बोदवड( हिंदुस्तान जनता पार्टी) 4, भिवराज रामदास रायसिंगे,चोपडा (अपक्ष ) 2, वसंत शंकर कोलते, जामनेर (अपक्ष )4, कुंदन टोपलू तायडे, यावल( अपक्ष)2, शेख आबीद शेख बशीर, मलकापूर (अपक्ष )2, एकनाथ नागो साळुंके उर्फ अण्णासाहेब साळुंके, जामनेर ( अपक्ष)2, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा ( बहुजन समाज पार्टी) 3 असे एकूण 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी संजय एकनाथ माळी, हनुमान नगर धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे आपला उमेदवारी अर्ज शनिवार 20 एप्रिलरोजी दाखल केला. तर शनिवारी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.