भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ३० जणांनी इस्लाम धर्म सोडून सनातनमध्ये घरवापसी केली आहे. यासोबतच त्यांनी आपली इस्लामिक नावे सोडून हिंदू नावे धारण केली आहेत. हिंदू धर्मात घरवापसी करण्यासाठी विशेष विधी आयोजित करण्यात आला होता. या सर्वांनी धर्म सोडण्यासाठी कायदेशीर अर्जही केला आहे.
इंदूरमधील खजराना मंदिरात या घरवापसी विधीचे आयोजन करण्यात आले होते. येथे यज्ञही करण्यात आला. त्यात हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या सर्वांनी सहभाग घेतला. याआधी त्यांना गंगाजल आणि गोमूत्रासह देशातील १० विविध नद्यांच्या पाण्याने स्नानही करण्यात आले होते. हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्यांमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. या लोकांनी आपले धर्मांतर कायदेशीर करण्यासाठी इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जही केला आहे. याशिवाय ओळखपत्रातील त्यांची ओळखही बदलता येईल. हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्यांनीही नावे बदलली आहेत.
घरवापसी करणाऱ्यामध्ये निलोफर शेख, अक्षा शेख, रज्जाक, अबरार, मुबारिक आणि रुकैया यांचा समावेश असून, प्रत्येकाने आपली नावे बदलली आहेत. त्यांची घरवापसी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांच्या संरक्षणात झाली. सनातनपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही असे त्यांनी म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे माळवा राज्य प्रमुख संतोष शर्मा म्हणाले की, “हे सर्व लोक स्वेच्छेने हिंदू धर्मात परतत आहेत. हिंदू धर्मात सामील होण्यासाठी या लोकांनी काही काळापूर्वी आमच्याशी संपर्क साधला होता. यानंतर त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली. ते सर्व जन्माने मुस्लिम होते आणि आता हिंदू होत आहेत.
संतोष शर्मा यांनी सांगितले की, ते यापूर्वीही हिंदू धर्मात प्रवेश घेणाऱ्यांना मदत करत आहेत. ते म्हणाले की त्यांच्या संपर्कात अजूनही बरेच लोक आहेत ज्यांना हिंदू धर्मात सामील व्हायचे आहे आणि त्यांनाही लवकरच घरी आणले जाईल. यापूर्वी एप्रिल महिन्यातही खजराना मंदिरात आठ मुस्लिम हिंदू धर्मात परतले होते. घरी परतलेल्या आठ जणांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. जे लोक हिंदू धर्मात परतले त्यांची नावेही बदलली.
या आठ जणांमध्ये हैदर शेखचाही समावेश होता. त्यांनी हरी नारायण हे नाव धारण केले. त्यानंतर त्याला सतत फोनवरून धमक्या येत होत्या. काही हल्लेखोरांनी हरी नारायण यांच्या घरावरही हल्ला केला. त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. याप्रकरणी हरी नारायण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत हरी नारायण यांनी म्हटले होते की, त्यांचे धर्मांतर केल्यामुळे मुस्लिम समाजातील काही लोकांनी त्यांना धमकावले आणि त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली.