Assembly Election 2024: पुन्हा एकदा जळगावकरांना आमदार म्हणून राजू मामाच हवे !

जळगाव । महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांचा मागील दहा दिवसापासून जोरदार प्रचार सुरु असून शहरातील विविध समाज, संस्था यांनी आमदार भोळे यांना विजयासाठी पाठींबा दिला आहे. विरोधकांच्या जवळीकांनी देखील आमदार भोळे यांना पाठींबा दिला असल्याने पुन्हा एकदा शहराचे आमदार म्हणून राजू मामांनाच पसंती मिळत आहे.

गेल्या दहा वर्षात आमदार भोळे यांनी केलेला शहराचा विकास आणि भविष्यातील जळगावमधील विकास यांसाठी आमदार भोळे यांनाच जळगावकरांनी पसंती दिली आहे. दहा दिवसात प्रचारात आमदार भोळे यांना शहरावासियांनी भरभरून प्रेम दिले आहे. फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या, घरोघरी औक्षण करून महिलांसह पुरुषांनी देखील आमदार भोळे यांना विजयाची ग्वाही दिली आहे. त्यामुळे राजू मामांचा विजय पक्काच असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरात शक्ती प्रदर्शन केले जाणार असून यात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार भोळे यांच्यावरील प्रेम आणि विश्वास दाखवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार राजुमामांची प्रचार तोफ धडाडणार
विधानसभा निवडणूकीचा १८ नोव्हेंबर हा प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. यानिमित्तान आमदार राजुमामा भोळे यांच्या शहारतील दोन भागात प्रचार दौरे होणार आहेत.  गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार राजुमामा भोळे यांची लोकप्रियता यातून दिसून येते आहे. अखेरच्या दिवशी अशाच प्रकारे मामांची तोफ धडाडणार आहे.

सोमवारी सकाळी ८ वाजता ख्वाजा नगरी पोलीस चौकी, हुडको, पिंप्राळा येथून प्रचाराला सुरूवात होणार आहे. यानंतर टायर भाऊ, आलीम भाऊ यांच्या घरापासून सिद्धार्थ नगर, भीम नगर बौद्ध वसाहत, मातंग वाडा, भिल वाडा, श्री. बंटी बारी, अतुल डेअरी, हुडको येथे समारोप होणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता जिएम फाऊंडेशन येथुन प्रचाराला सुरवात हेाईल. तेथुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, व नंतररेल्वे स्टेशन, नेहरू चौक, टॉवर चौक, सुभाष चंद्र बोस पुतळा, सिव्हिल हॉस्पिटल, पांडे डेअरी चौक, डी मार्, काव्यरत्नावली चौक, कलेक्टर बंगला येथुन अजिंठा रेस्ट हाऊसला वळसा घालून – एम.जे.कॉलेज रोड – एम.जे.कॉलेज गेट समोरून – महाराणा प्रताप पुतळा – रिंग रोड – डॉ.सहस्त्रबुद्धे दवाखाना – कोर्ट चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समाप्ती होणार आहे. या निमित्ताने अवघे शहर भाजपमय झाले आहे. सोमवारी पुन्हा एकदा भाजपमय शहर होणार आहे.