---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षभरापूर्वी अनेक घरकुलांची कामे मंजूर झाली व ती कामे पूर्वत्वास येत असतानाच शासनाने घरकुलांचा निधी कमी असल्याच्या तक्रारीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात घरकुलांसाठी ३५ हजार रुपयांची वाढ केली. त्याचप्रमाणे सौरऊर्जेसाठी १५ हजार रुपये जाहीर केले. असे एकूण ५० हजार रुपयांची वाढ केली आहे. मात्र सहा महिने होऊनही हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात पडत नसल्यामुळे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरापर्यंत घरकुलांची कामे वेगाने सुरू होती. पंतप्रधान घरकुल आवास योजना व नरेंद्र मोदी घरकुल योजना अशा दोन योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी या घरकुल योजनेत जिल्ह्यात अनेक घरकुले मंजूर झाली होती. या घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच शासनाने ३५ हजार रुपये वाढीव निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे १५ हजार रुपये सौर ऊर्जेसाठी ही मंजूर केले. ५० हजार रुपये मंजूर झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हा निधी अद्यापही प्रशासनाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्यापही हे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे घरकुलधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून अद्याप निधीच नाही – लोखंडे
यासंदर्भात जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेचे (डी. आर. डी.ए.) चे प्रकल्प संचालक लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता शासनाने घरकुलधारकांसाठी ३५ हजार रुपयांची वाढ केली आहे. त्याचप्रमाणे सौरऊजसाठी १५ हजार रुपये वाढ केली आहे. असे एकूण ५० हजार रुपये निधी वाढवण्यात आला आहे. मात्र अद्याप निधीच आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल दीड लाख लाभार्थ्यांना पैसे पाठवणे थांबले आहे.