---Advertisement---
जळगाव : रावेर तालुक्यातील वडगाव येथे चिनावल रस्त्यावर केळीच्या बागेत एक दिवसाचे अर्भक आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात महिलेने या एक दिवसाच्या बालकाला या ठिकाणी सोडून पळ काढल्याची सांगण्यात येत असून, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
वडगाव येथील पोलिस पाटील संजय वाघोदे तसेच चिनावल येथील पोलिस पाटील नीलेश नेमाडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी निंभोरा पोलिस ठाण्यात माहिती दिली. फौजदार दीपाली पाटील यांनी घटनास्थळी जाऊन या एकदिवसीय बालकास ताब्यात घेतले.
या बालकाला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात दाखल करण्यात आले. यावेळी चिनावल येथील डॉ. जयंत पाटील यांनी सहकार्य केले. वडगाव येथील पोलिस पाटलांनी फिर्याद दिल्याने निंभोरा पोलिसांना गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दीपाली पाटील करीत आहेत.