---Advertisement---

One Nation One Election : लोकसभेत आज सादर होणार ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक !

---Advertisement---

One Nation One Election : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आज ‘एक देश, एक निवडणूक’ संदर्भातील संविधान (१२९ वी दुरुस्ती) विधेयक २०२४ लोकसभेत मांडणार आहेत.

प्रमुख मुद्दे

विधेयक सादरीकरण
हे विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. सर्व खासदारांची उपस्थिती अनिवार्य आहे.

विरोधी पक्षाचा आक्षेप
काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने तातडीची बैठक घेतली असून त्यांच्या खासदारांसाठीही व्हीप जारी केला आहे.

संयुक्त समितीकडे सादर होण्याची शक्यता
विधेयक चर्चेसाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवले जाऊ शकते. समितीतील सदस्य काही दिवस या विधेयकावर चर्चा करतील व त्यानंतर सुचना मागवण्यात येतील.

प्रक्रिया पुढीलप्रमाणे
समिती आपला अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर करेल.
नंतर हे विधेयक दोन्ही सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडले जाईल.
दोन्ही सभागृहांतील मंजुरीनंतर विधेयक राष्ट्रपतींना स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल.
राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.

घटनादुरुस्ती आवश्यक पाठिंबा
घटनादुरुस्ती मंजूर होण्यासाठी सभागृहात उपस्थित असलेल्या दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.

लोकसभा: ३६२ सदस्य
राज्यसभा: १५६ सदस्य

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment