एक रस हिंदू , एक संघ भारत हा विश्व कल्याणासाठी आवश्यक : माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी

तरुणभारत लाईव्ह न्युझ  फैजपूर, ता. यावल : भारतीय संस्कृती महान असून, हिंदू धर्म याचा प्रमुख गाभा आहे. आज आपण अतिशय वेगाने प्रगतीशील समूह म्हणून आगेकूच करत असताना जात नव्हे तर धर्म हीच आपली ओळख असावी. एक रस हिंदू व एकसंघ भारत हा विश्व कल्याणासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी महाकुंभाच्या शेवटच्या सत्राला मार्गदर्शन प्रसंगी केले.

येथील निष्कलंक धाम वडोदा फैजपूर परिसरात पार पडलेल्या समरसता महाकुंभाच्या शेवटच्या सत्राला मार्गदर्शन करताना त्यांनी विविध -दिव्य आणि मुद्यांना स्पर्श करीत ऐतिहासिक समरसता महाकुंभ आयोजनाबद्दल महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, देशातील प्रांत भाषा जरी वेगवेगळी असली तरी आम्ही सारे भारत वासी आहोत. प्रांत – जाती भेद नष्ट व्हावा वंदे मातरम – भारत माता की जय या जय घोषणा नारामध्ये भारत देश ही आमची माता- जननी व देशात राहणारे आम्ही सर्व भारतीयात बंधुत्वाची प्राचीन भारतीय धार्मिक – अध्यात्मिक – ऋषी साधनेची संस्कृती संपूर्ण विश्वाला विश्वशांतीचा संदेश देते. भारत विश्व गुरू महाशक्ती बनण्यासाठी हिंदू एक रस व भारत एक संघ होण्याची नितांत गरज आहे. भारत आज प्रांत वादात वाटला गेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधानात सादर करतात की, हम भारत लोक (काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते अरुणाचल) अशा भारताला जोडण्याचे खरे सामर्थ्य भारत माता की जय आहे. भारतात प्रांत भाषा भिन्नभिन्न असले तरी भाव एकच आहे आणि हाच सद्भाव भारताला एक संघ ठेवू शकतो. या देशात प्राचीन काळापासून बारा ज्योतिर्लिंग विविध धार्मिक मठ स्थापित आहेत. या जागी एकाच भावाने एकाच परंपरेने पुजले जातात. मात्र असे असताना प्रांतीय भेदभाव कशासाठी? असा प्रश्न भैय्याजी जोशी यांनी उपस्थित केला.

हिंदू समाज एक रसतामध्ये बाधा का निर्माण होत आहे. भारतात व्यक्तीची गणना ही जातीधर्मावर आधारित केली जात आहे. मनुष्य कोणत्या जातीत जन्माला येतो हा अधिकार कोणाच्याही हातात नसून तो अधिकार ईश्वराच्या हातातच आहे. मात्र मनुष्य त्याला जातीत ढकलण्याचे पाप करतो याची खंत त्यांनी व्यक्त केली. गतकाळात उडपी येथे धर्माचार्‍यांच्या संसदेत चार प्रमुख ठराव पारित झाले होते. हिंदवा सौध रे, सर्वे न हिंदू पतितो भवे, मम दीक्षा हिंद ूू रक्षा, मम मंत्र हिंदू समानता हे चार मुद्दे जरी सर्वांनी आत्मसात केले तरी सर्व दुविधा दुरी – संघर्ष संपुष्टात येतील. हिंदू एक रसता – राष्ट्र एक संघ होतील. भारत विश्व गुरू होईल, असा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, मध्यप्रदेशच्या माजी मंत्री अर्चना दीदी चिटणीस, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खंडवा (मध्यप्रदेश) खासदार ज्ञानेश्वर पाटील आदींसह संत महंत मान्यवर, भाविक उपस्थित होते