कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतला होता. ही बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, आता 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बोले तैसा न चाले अशाच प्रकारचं हे सरकार असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.