शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक : बँक खात्यातून परस्पर काढले पावणे तीन लाख रुपये

xr:d:DAFe8DR0y38:2555,j:5606279853082831299,t:24040810

जळगाव : चोपडा तालुक्यातील एका शेतकऱ्याची सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणूक करत त्याच्या बँक खात्यातून जवळपास २ लाख ८१ हजार ४२१ रुपये लुबाडल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर ठगांद्वारे ऑनलाईन फसवणुक करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याच प्रकारात चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणुकीचा प्रकार घडला आहे. चोपडा तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी बापूराव आधार पाटील (वय ४७,) हे शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे चोपडा येथील बंधन बँकेच्या शाखेत बचत खाते आहे. या खात्यात त्यांनी पैसे ठेवले होते. सायबर भामट्यांनी त्यांना बंधन बँक शाखा चोपडा येथील खाते क्रमांकाद्वारे ऑनलाइन पद्धतीने ओटीपी पाठविला. त्यानंतर ट्रान्झेक्शन आयडीद्वारे ही रक्कम परस्पर काढून घेत शेतकऱ्यास २ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला धाव घेतली. तेथे तक्रारीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.