---Advertisement---

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरसाठी कोणी निवडले टार्गेट ? ज्यामुळे लष्कराला करता आली मोठी कारवाई

---Advertisement---

Operation Sindoor: काश्मिरातील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याचा बदला भारतानं घेतलाय. भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत ही कारवाई केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, नौदल, लष्कर आणि हवाई दलांना भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने या दहतवादी ठिकाणाची सीक्रेट डिटेल्स दिली होती.

कोणत्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले?

पाकिस्तानमधील बहावलपूर आणि मुरीदके हे दहशतवादी तळ निशाण्यावर होते. बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्य तळ होते. तर लाहोरचे मुरीदके हे लश्कर ए तोयबाचे तळ होते. भारतानं एअर स्ट्राइक करताना कुठल्याही सैन्याच्या ठिकाणाला टार्गेट केलेले नाही. तर नागरिकांनाही कोणताही धोका पोहोचलेला नाही. दहशतवादी गटांचे तळ हेच हवाई दलाच्या निशाण्यावर होते.

बहावलपूर

पंजाब प्रांताचे संवेदनशील स्थान

मुरिदके (हाफिज सईदचे अड्डे)

कोटली

मुझफ्फराबाद

कधी झाली कारवाई ?

ऑपरेशन सिंदूर ७ मे २०२५ रोजी पहाटे १:३० वाजता राबवण्यात आले. एकूण २४ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ९० दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या कारवाईत लष्कराचे वरिष्ठ कमांडरही मारले गेले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment