मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आयुध निर्माणी फॅक्टरी खमारिया येथे मंगळवारी दि . 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य १३ कर्मचारी जखमी झाले आहेत. अलेक्झांडर टोप्पो आणि रणवीर कुमार अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फॅक्टरीतील F6 विभागातील बिल्डिंग क्र . 200 मध्ये सकाळी 10 वाजता रशियन पेचोरा बॉम्ब रिकामा करताना असताना हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी इमारतीमध्ये सुमारे 25 ते 30 किलो स्फोटक भरलेली होती. स्फोट इतका भीषण होता की F6 विभागाच्या इमारतीसोबतच शेजारील इमारतही कोसळली. अपघाताच्या वेळी दोन्ही इमारतींमध्ये 15 कर्मचारी उपस्थित होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फॅक्टरीतील अलेक्झांडर टोप्पोचा जागीच मृत्यू झाला, तर रणवीर कुमारचा खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहि. या अपघातात जखमी झालेल्या श्यामलाल ठाकूर आणि चंदन कुमार यांची प्रकृती चिंताजनक असून आहे. याशिवाय उमेश मौर्य, प्रवीण दत्ता, कृष्णा पाल, एसके मंडल, रिपू कुमार, सायमन अँथनी, गौतम कुमार, रामबिहारी, प्रदीप साहू, अभिषेक आनंद आणि राहुल सिंग यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आयुध निर्माणी खमारियाचे महाव्यवस्थापक आर के गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अपघाताच्या कारणांची चौकशी करेल. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ॲम्युनिशन इंडिया लिमिटेड (एमआयएल) चे सीएमडी देवाशिष बॅनर्जीही जबलपूरला पोहोचले आहेत, जिथे ते सुरक्षा आणि दक्षतेशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.