Independence Day : श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे ‘तिरंगा रॅली’चे आयोजन

जळगाव :  श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने स्वातंत्र्य दिनाच्या  ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत आज मेहरुण भागात भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी“तिरंगा रॅली” काढून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. रॅलीत सहभागी विद्यार्थांनी भारत मातेसह विविध महापुरुषांची तसेच सैनिकांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत नाईक व संचालिका अर्चना प्रशांत नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सातवीच्या विद्यार्थ्यांनीनी वेलकम डान्स सादर केला. इयत्ता तिसरी चौथीच्या विद्यार्थिनी लेझीम डान्स साजरा केला. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना भाषणे दिली. संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल कोळी मॅडम यांनी केले. ७८ वा स्वातंत्र्य दिन आज शाळेत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि निमंत्रितांनी मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला