जळगाव : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार 29 जून रोजी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड. अ. वा. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या सुरवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे ,चिटणीस अभिजित देशपांडे ,संचालक पारसमल कांकरिया, कवरलाल संघवी, श्रीनाथ देवकर, रजनी पाठक तसेच गुरूवर्य ॲड.अ.वा.अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. अशोक माथूरवैश्य, सचिव ॲड. सुधीर कुलकर्णी, ॲड. पंकज अत्रे, ॲड. देशपांडे,आदींच्या हस्ते संस्थेचे माजी कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब अ.वा.अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अपर्ण करून आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल,जळगाव व राष्ट्रीय बाल आरोग्य कल्याण विभाग यांच्यातर्फे उपस्थित डॉ. लोकेश चौधरी, डॉ. शीतल गायकवाड,डॉ. लीना बडगुजर, फार्मसिस्ट स्वाती इंगळे, अझरा पटेल, ए. एन. एम. दीपा भावे यांचे स्वागत संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व संस्थेचा वार्षिक अंक विवेक देऊन करण्यात आले. या वेळेस शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधी देण्यात आली. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना वह्या व पाठ्यपुस्तकं संच मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यासाठी माजी विद्यार्थी उल्हास ठाकरे, कल्पेश जैन, मयुरेश गांगुर्डे तसेच शिक्षक आनंद पाटील,हिम्मत काळे, राजेश महाजन, योगेश सोनजे, बापू पाटील आदींचे सहकार्य लाभले.
या वेळेस नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित अखिल भारतीय शिव साहित्य संमेलनात शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग किल्ला उत्तमपणे साकारल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक प्रशांत जगताप व श्रीकांत घुगे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन व आभार संजय वानखेडे यांनी मानले. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, प्रशांत जगताप,पर्यवेक्षक गणेश महाजन व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.