जळगाव : मागील १३ वर्षापासून सावखेडा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व करपट्टी, घरपट्टी आदी कर कोल्हे हिल्स परिसरातील नागरिक वेळेवर भरतात. परंतु, ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलावर धडक मोर्चा काढण्यात येईल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा मनसेतर्फे ग्रामपंचायत अधीक्षक यांना निवेदनाद्वारे ९ सप्टेंबर रोजी देण्यात आला.
सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरामध्ये माऊली नगर, गोकुळ धाम नगर, विश्वकर्मा चौक, शिवबा नगर, न्यु लक्ष्मी नगर नवनाथ नगर, साईबाबा मंदिराजवळील परिसर आदी भागातील रहिवाशी १२ ते १३ वर्षापासून या परिसरात रहात आहेत. हा परिसर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांच्याच मतदार संघामध्ये येतो. परंतु, त्यांच्याच मतदार संघात स्वच्छता पहावयास मिळत नसल्याने ते दुसरीकडे काय स्वच्छता करतील ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या समस्यांबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देवूनही त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. यामुळे यानागरिकांनी मनसेकडे त्यांचे समस्यांबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. यानंतर या परिसरामध्ये मनसे पदाधिकारी यांनी नागरिकांचे समस्यांबाबत प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना वापरण्यासाठी पक्के रस्ते, सांडपाण्याचा निचरा होणेसाठी गटारी, स्ट्रीट लाईट नसल्याचे आढळून आले. या समस्या येत्या १० दिवसाच्या आत मार्गी लावाव्यात अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे. या समस्या मार्गी न लागल्यास मनसेतर्फे परिसरातील सर्व महिला, पुरुष यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, शहराध्यक्ष किरण तडले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, उपशहर अध्यक्ष चेतन पवार, शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा उपसंघटक साजन पाटील, शहर सचिव जितेंद्र पाटील, मनसे तालुकाध्यक्ष हेमंत कोळी, तालुका संघटक संदीप मांडोले, मनवीसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जनहित शहर सचिव भिकन शिंपी, हरिओम सूर्यवंशी, खुशाल ठाकूर, किरण सपकाळे, प्रशांत बाविस्कर, राहुल चव्हाण, दीपक राठोड, गोविंद जाधव, ऍड. सागर शिंपी, गणेश नेरकर, सागर पाटील, अविनाश जोशी, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, मिहीर सोनार, किशोर खलसे, अनिल दिघे, सोनू सोनार, रोहित चौधरी, प्रथमेश जोशी, प्रणव चव्हाण, पंकज चौधरी, ऐश्वर्य श्रीरामे, राजू डोंगरे यावल शहर अध्यक्ष गौरव कोळी किशोर नन्नवरे आदी उपस्थित होते.