पावसाचा प्रकोप : 145 घरांचे नुकसान

रावेर : शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये शिरल्याने रावेरसह रमजीपूर, शिंदखेडा  भागातील सुमारे 145 नागरीकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे पुराच्या पावसात नुकसान झाले तर अनेकांच्या घराची पडझडदेखील झाल्याने नागरीक रस्त्यावर आले आहेत. प्रशासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत तातडीने बेघर झालेल्यांना निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पुढे आहे.

संततधार पावसामुळे या भागातील नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे सुमारे दहाहून अधिक गुरे वाहिल्याने ऐन हंगामात शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. तातडीने भरपाईची देण्याची मागणी आहे. रावेर तालुक्यात पुरामुळे 145 घरांची पडझड

बुधवार,5 जुलै: रोजी शहरासह तालुक्यात तसेच मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुकी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे.  खिरोदा प्र.रावेर येथील नदीचे पाणी जिल्हा परीषद शाळेत शिरल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तर तलाठी कार्यालयातही पाणी शिरले मोठे नुकसान झाले. खिरोदा, रमजीपूर, शिंदखेडा, रसलपूर, रावेर  येथील नदी काठावरील घरात पुराचे पाणी शिरल्याने प्रतिकुल परीस्थितीत जीवन जगत असलेल्या रहिवाशांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. शिवाय अन्नधान्यही या पावसात भिजल्याने त्यांच्यावर मोठे आभाळ कोसळले आहे. नागझिरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रसलपूसह रावेर येथील एकूण दहा बकर्‍या वाहिल्या तर पूरात चार बैल, पाच गायी व एक म्हैस वाहिली.रावेर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रावेर : तहसीलदार बंडू कापसे यांनी रात्रीच पूर परीस्थितीची व नुकसानीची पाहणी करीत उपाययोजना केल्या आहेत. महसूल कर्मचार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.