तीन हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

तरुणभारत लाईव्ह न्यूज : मध्य रेल्वे मार्गावरील विशेष तपासणी धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध ६ मोठ्या रेल्वे स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणार्‍या तीन हजाराहून अधिक फुकट्या प्रवाशांकडून २३ लाख २७ हजार ८६ रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

विशेष तिकीट तपासणी मोहिमेत २३ लाखांहून अधिक महसूल जमा

मध्य रेल्वेतर्फे नाशिक मनमाड भुसावळ अकोला खंडवासह अन्य स्थानकांवर धडक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीस आणि अन्य कर्मचारी असे ४६ पथके तैनात करण्यात आली होती. यात ३ मुख्य अधिकारी २८० कर्मचार्‍यांचा समावेश होता. यामध्ये १८० तिकीट तपासणीस, ४५ अन्य कर्मचारी तसेच ५५ आरपीएफ स्टाफ असे एकणू २८० कर्मचारी वर्गातर्फे ६ मुख्य स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात तीन हजार ९१५ विनातिकीट वा योग्य तिकीट न घेता प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला. यात सर्वात जास्त महसूल १ लाख ७ हजार १५० रूपये नाशिक रोड रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवाशांकडून वसूल करण्यात आला. भुसावळ ४९ हजार १००, मनमाड ३६ हजार १६६, अकोला, बडनेरा आणि खंडवा अशा ६ मोठ्या स्थानकांवर अप आणि डाऊन मार्गावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येवून २३ लाख २७ हजार ८६ रूपये दंडात्मक रकम विनातिकीट वा योग्य प्रवासाची तिकीटे न घेता प्रवास करीत असताना वसूल करण्यात आली.