Pachora : मोटारसायकल चोरी व पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या पिंपरी येथील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. सचिन बापूराव पाटील (वय २९) व भगवान लक्ष्मण पाटील दोन्ही (रा. पिंपरी, ता पाचोरा) अशी संशयितांची नावे आहेत.
तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन (८५/२०२५) ला शेतामधील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भागात होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउनि शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, रणजित जाधव, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, भारत पाटील सर्व स्थागुशा जळगाव यांचे पथक नेमण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सचिन बापूराव पाटील (रा. पिंपरी ता. पाचोरा) याने त्याच्या साथीदारासह पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारींची चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यावरून सदर पथकाने सचिन बापूराव पाटील (रा. पिंपरी) याबाबत माहिती काढून त्यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे भगवान लक्ष्मण पाटील व राहुल त्र्यंबक पाटील दोन्ही. (रा. पिंपरी) यांच्यासोबत मिळून पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली.
यावरून भगवान लक्ष्मण पाटील व राहुल त्र्यंबक पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या १७ इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार जप्त करण्यात आल्या. या दोघांनी मिळून मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी चोरीच्या ४ मोटारसायकली काढून दिल्या.
Pachora Crime : पिंपरीतील मोटारसायकल व मोटार चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
by team
Published On: एप्रिल 13, 2025 11:03 am

---Advertisement---