Pachora Educational News: पीटीसी संस्थेने केलेल्या सन्मानाने भारावले शिक्षक

पाचोरा : येथील पीटीसी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी  गो. से. हायस्कूल मधील शिक्षकांचा सन्मान केल्याने शिक्षक कमालीचे भारावले. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ होते. प्रमुख  मार्गदर्शक म्हणून पुणे येथील पुरोगामी विचारवंत विकास लवांडे उपस्थित होते.

पीटीसी संस्था संचलित गो. से. हायस्कूलला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान रविवारी करण्यात आला.

सारोळा रोडवरील श्री समर्थ लॉन्स मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विकास लवांडे यांनी उपस्थित शिक्षकांना अध्ययन अध्यापन प्रक्रिये संदर्भात उपयुक्त टिप्स देऊन शिक्षकांनी आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडावे. विद्यार्थी माणूस करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारचा भेदभाव विद्यार्थ्यांच्या मनात राहणार नाही अशी शिकवण द्यावी असे आवाहन केले.

या सन्मान सोहळ्यास संजय वाघ, ॲड. महेश देशमुख , व्ही. टी. जोशी, सुरेश पाटील,  प्रा. प्रदीप पाटील (चोपडा), गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील व गणेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, खलील देशमुख, वासुदेव महाजन, जगदीश सोनार, हर्षल पाटील, दगाजी वाघ, विनय जकातदार, शालिग्राम मालकर, अजहर खान, प्रा. राजेंद्र चिंचोले,  सिताराम पाटील, सतीश चौधरी, नितीन तावडे, विकास पाटील, मधुकर पाटील, नानासाहेब देशमुख, भूषण वाघ, अर्जुनदास पंजाबी, ॲड. अविनाश सुतार, शांताराम नाना पाटील, डॉ. जयंत पाटील, प्रा. भागवत महालपुरे, डॉ. स्वप्निल पाटील, शशिकांत चंदिले, हारुन देशमुख, ललित वाघ आदी उपस्थित होते.

संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमा पूजनाने उद्घाटन करण्यात आले. गो. से. हायस्कूलच्या प्रगतीची चित्रफीत दाखवण्यात आली. माजी मुख्याध्यापक व विद्यमान मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.  दिलीप वाघ, संजय वाघ व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शासनाच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी खलील देशमुख व दिलीप वाघ यांनी आपल्या मनोगतात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळा विकासासाठी दिलेल्या योगदाना संदर्भात कौतुक केले.व गो से हायस्कूल मधील विविध विद्यार्थी हिताच्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमास  संस्थेचे पदाधिकारी, संचालक, शिक्षक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रास्ताविक चेअरमन संजय वाघ यांनी केले.  सूत्रसंचालन महेश कौंडीण्य यांनी केले तर आभार आर. बी. बोरसे यांनी मानले.