---Advertisement---
Pachora News: पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) हिचा पती नितीन दौलत शिंदे (वय ४०) याने दि. १९ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास खून केला आहे. अर्चना उर्फ कविता या गाढ झोपेत असताना चरित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करत हा खून करण्यात आला. सदर घटनेमुळे लोहारा व परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी स्वतःहुन लोहारा पोलिसात दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली, याबाबत पिंपळगाव(हरे) पो.स्टे.ला आरोपी विरुद्ध विविध कालमांन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.
मयत अर्चना व तीचा पती मोलमजुरी करून आपला घरचा चरितार्थ चालवत असत, मात्र पती नितीन दौलत शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे व माहेरच्यांनी शेत विकले आहे तू त्यांच्या कडून पैसे आन अशी मागणी करत असे, तसेच तिची सासू बेबाबाई दौलत शिंदे ह्या सुद्धा तिला नेहमी शिवीगाळ करत असल्याचा आरोप मयत अर्चनाचा भाऊ आकाश कडुबा सपकाळे (राहणार शिवना, ता. सिल्लोड) यांनी केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव(हरे)पो.स्टे. च्या सहा.पोलीस निरीक्षक कल्यानी वर्मा यांनी तात्काळ त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक टीमला पाचारण केले व घटनास्थळाची फॉरेन्सिक चौकशी केली तसेच सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी(होम)अरुण आव्हाड यांनी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले.
याबाबत मयताचा भाऊ आकाश कडुबा सपकाळे यांनी पिंपळगाव(हरे) पोलीस स्टेशला दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव(हरे)पो.स्टे. ला आरोपी विरुद्ध कलम१०३(१),८५,११५(२),३५२,३(५)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव(हरे)पो.स्ट.च्या सहा.पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहेत.