---Advertisement---
Pachora News : पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका विवस्त्र इसमाने धिंगाणा घालीत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी आरोपी इसमा विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक अशी ही घटना दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, विवाहित महिला घरातील चक्कीवर दळण दळीत असतांना घरासमोरील राहणारा इसम याने अचानक निर्वस्र अवस्थेत घरात घुसुन विवाहितेजवळ आला व त्याने त्या महिलेला मारहाण करुन साडी ओढत हात धरुन महिलेस घराच्या कंपाऊटच्या गेटपर्यत ओढुन नेले. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत सदर इसमाच्या तावडीतुन त्या महिलेची सुटका केली व त्या आरोपी इसमास पोलिसांनी ताब्यात घेत अंबुलन्सने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून त्या आरोपी इसमा विरोधात विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहेत.
‘त्या’ इसमास ठाण्यात हलविले
महिलेचा विनयभंग करणारा इसमास पोलिसांनी ताब्यात घेत पाचोरा ग्रामीण रुग्णालय नेले. येथून त्याला जळगाव हलविण्यात आले व तेथून इसमाच्या नातेवाईकांनी त्याला ठाणे येथे घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
---Advertisement---