Pachora News : गिरणा नदीवरील पुलाचे काम मंजूर ; आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पाचोरा : माहेजी येथील गिरणा नदीवरील पुलासाठी आमदार किशोर  पाटील यांच्या प्रयत्नातून २० कोटी रुपयाच्या पुलाचे काम मंजूर करण्यात आले आहे. माहेजी व हनुमंतखेडा गिरणा नदीवरील जोडणारा पूलाच्या भुमीपुजन प्रसंगी नांद्रा सह परिसरातील कुरंगी,माहेजी,वरसाडे, आसनखेडा, लासगाव, सामनेर, बांबरुड, खेडगाव मोहाडी,हडसन, पहाण, एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडा, उत्राण,जवखेडा, ताडे, भातखंडे बाम्हणे गावांच्या सरपंच,उपसरपंच,सदस्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत या पुलाचा भूमिपूजन समारंभ आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी  माहिजी देवीची दर्शन घेऊन गिरणा नदीच्या नियोजीत जागेवर पूजन करून नारळ, ओटी,वाहून, टिकावं टाकून भूमी पूजन करण्यात आले. तसेच गावातील विविध शासकीय क्षेत्रात निवड झालेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला.  यात तेजस्विनी बडगुजर ही महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत निवड झाल्यामुळे तिचा सत्कार तसेच दिनेश कमलाकर बडगुजर आर्मीमध्ये भरती झाल्यामुळे अविनाश पंढरीनाथ पाटील हायकोर्ट स्टेनोपदी  व सचिन बडगुजर याचीही आय. टी. आय प्रोफेसरपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा सत्कार आमदार किशोर  पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

माहेजी येथील जय गुरुदेव सत्संग भक्त मंडळ यांच्याकडूनही आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी आमदार पाटील यांनी  सांगितले की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच गिरणा नदीवरील दळणवळण सोयीस्कर व्हावे म्हणून पाचोरा -भडगाव तालुक्यात आत्तापर्यंत आपण गिरणा नदीवरील सात पुलांचे कामे पूर्णत्वास नेले. प्रत्येक खेडूपाड्यांना रस्त्याने जोडून रस्त्याचे जाळे विनले आहे.  तसेच वीज वितरण कंपनीचे या गटात माहेजी येथे स्वतंत्र सबस्टेशन निर्माण केले.  खेडगाव (नंदीचे) तेथेही नवीन सबस्टेशनला मंजुरी मिळवून त्याचेही  टेंडर निघाले आहे.  गावांना पिण्यासाठीच्या वॉटर सप्लाय विहिरीसाठी २४ तास विद्यूत पुरोठ्यासाठी स्वतंत्र गावठाण फिटरची व्यवस्था करण्याचे कार्य सुरू आहे.  तसेच आसनखेडा, बांबरुड, बहुळेश्वर, सामनेर, वेरूळी असे रस्त्याचे जाळे जोडणे सुरू आहे.

आत्तापर्यंत सुमारे ३ हजार करोड रुपयांची विकासकामे केली आहे. परंतु, त्यामध्ये मला कधीच कोणत्याच कामाचा व गोष्टी चा अभिमान नाही परंतु एका गोष्टीचा व कामाचा मात्र मला सार्थ अभिमान व स्वाभिमान आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणारे माझ्या राजाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम  पाचोरा – भडगाव तालुक्यात प्रत्येक गावात  शंभर टक्के शिवस्मारक उभारणी कार्य माझ्या हातून झाले याचा मला अभिमान व स्वाभिमान असल्याचे सांगितले.
या  शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन आपण ते सुद्धा कार्य मार्गी लावू अशी ग्वाही दिली.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, मका यांचे होणाऱ्या प्रचंड प्रमाणात नुकसानीचे कृषी अधिकारी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सांगून सरसकट दुष्काळ जाहीर करावा व पिक विमा कंपन्यांना सूचना कराव्यात  या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण मागणी केले असल्याचे सांगितले. तसेच चारशे किलोमीटर शेत रस्ते मंजूर करण्यात आले आहे. सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले.तर आभार हरीश पाटील यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य पदमसिंह पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश  पाटील, हेमंत चव्हाण, धर्मा बाविस्कर,पंढरीनाथ पाटील,जितेंद्र जैन,विनोद तावडे, प्रदीप पाटील, विजय पाटील (वेरुळी),एल.डी.पाटील आसनखेडा ,शाखा अभियंता डि.एम‌.पाटील, जवखेडा माजी सरपंच दिनेश आमले, उत्राण सरपंच ज्ञानेश्वर महाजन, शिवाजी कोल्हे,नांद्रा सरपंच सुभाष  तावडे, किरण पाटील हडसन,शिवाजी तावडे,,गजानन पवार, मनोज पाटील,समाधान पाटील, पंकज बाविस्कर ,जगताप पाटील,बापु पाटील, पोलिस पाटील राजेंद्र पाटील,शुभम पाटील,युवराज काळे,नरेश  पाटील,पवन  पाटील, हरीश  पाटील,समाधान पाटील, सारंग पवार,गणेश  पाटील, माहेजी सरपंच कैलास नारायण पाटील, गौतम साळवे,हरीष  पाटील, शिवाजी पाटील,विकास पाटील, शुभम पाटील, राजू पवार,  फुलचंद बडगुजर,समाधान पाटील,राजेंद्र गायकवाड,मोहित पाटील,आनंदा बोरसे,सह विविध  सेना पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.