पाचोरा : मुसळधार पाऊस कोसळत असतांना शेकडो महिला कुणासाठी गावात वाट पाहतील यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हेच चित्र तालुक्यातील वरखेडी येथे शेतकरी शिवसंवाद यात्रेत दिसून आले. येथील नारीशक्तीने एकमुखाने वैशाली सुर्यवंशी यांच्या पाठीशी उभी राहण्याची दिली ग्वाही .
सध्या जोरदार पाऊस कोसळत असून देखील वैशाली सुर्यवंशी या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संवाद साधत आहेत. अनेकदा भर पावसातच त्यांची यात्रा सुरू असल्याचे चित्र आधीच दिसून आले आहे. यात वरखेडी खुर्द गावात अभूतपुर्व दृश्य दिसून आले. शुक्रवारी दुपारी वैशाली सूर्यवंशी या आपल्या सहकाऱ्यांसह या गावात गेल्या असतांना मुसळधार पाऊस सुरू झाला. तथापि, पाऊसपाण्याची पर्वा न बाळगता गावातील शेकडो महिला त्यांच्या स्वागताला उपस्थित होत्या.
वैशाली सूर्यवंशी यांचे स्वागत केल्यावर उपस्थित माता-भगिनींनी त्यांना विविध समस्यांसाठी साकडे घातले. यात प्रामुख्याने गावात सार्वजनीक शौचालय नसल्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याची व्यथा कथन करण्यात आली. तसेच रस्त्यांची समस्या गंभीर असल्याचे देखील सांगण्यात आले. यावर वैशाली सूर्यवंशी यांनी समस्यांचे नक्कीच निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यानंतर पाऊस सुरू असतांनाच वैशाली सूर्यवंशी यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर लासुरे गावात देखील शेतकरी शिवसंवाद यात्रेचे स्वागत झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला .
शेतकरी शिवसंवाद यात्रेत उध्दव मराठे, अरूण पाटील, अभय पाटील, गजू पाटील, अभिषेक सोनार, धनराज पाटील, अरूण तांबे, तिलोत्तमा मौर्य, योजना पाटील, कुंदन पांड्या, ज्ञानेश्वर चौधरी, आनंदा चौधरी, जगदीश पाटील, शाम वाघ, जिभू सपकाळे, पितांबर सपकाळे, अनिल पाटील, विश्वास मराठे, विनोद मराठे, शिवदास मराठे, प्रवीण पाटील, समाधान चव्हाण, दीपक चव्हाण, अनिता पाटील, जयश्री येवले, प्रतिभा ईश्वर पाटील, बेबा पाटील, प्रतिभा रवींद्र पाटील यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी यांच्यासह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.