तरुण लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । पाचोरा शहरातील दुकान फोडी प्रकरणी संशयित आरोपीस जळगाव सब जेल येथून पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीस पाचोरा न्यायालयात सादर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पाचोरा शहरात जामनेर रोड लगत असलेल्या सु.भा. पाटील कॉम्प्लेक्स मधील अमोल दत्तात्रय येवले (राहणार पाचोरा) यांच्या मालकीचे त्र्यंबक गडबड वाणी हे किराणा दुकान व साक्षीदार रमेश वाणी यांचे न्यू शितल प्रोविजन जनरल स्टोअर्स या किराणा दुकानांचे अज्ञात चोरट्यांनी दि. 11 ऑगस्ट रोजी रात्री रात्री ९ ते दि. 12 ऑगस्ट सकाळी ९ वाजे दरम्यान लोखंडी शटर चे कुलूप तोडून आत प्रवेश करून 16 हजार पाचशे रुपये चोरी करून पसार झाले होते.
या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 26 नोव्हेंबर रोजी रात्री त्यावेळेस संशयित आरोपी अकबर लुकमान खान (23) (रा.ग्राम पंचायत जवळ दौला वडगाव ता.आष्टी जि. बीड) हा चाळीसगाव परिसरात फिरताना आढळून आल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.
दरम्यान चाळीसगाव शहरातील घर फोडीच्या घटना घडल्या असून पाचोरा पोलिसांनी मोबाईल सिडीआर व सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज वरून जळगाव सबजेल मध्ये असलेल्या अकबर लुकमान खान या आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली असून आरोपीस पाचोरा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहे.