Pahalgam Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला कधीही न विसरता येणारा धडा शिकवण्यात यावा, असा दवाब देशभरातून सरकारवर वाढत असताना पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्णपणे मुभा दिली आहे. आमचा तिन्ही सेनादलांवर पूर्ण विश्वास आहे. पाकिस्तानविरोधात कारवाईची पद्धत, वेळ, ठिकाण आणि लक्ष्य सेनादलांनी ठरवावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या काही दिवसात सरकार पाकिस्तानविरुध्द कठोर लष्करी कारवाई करणार असे संकेत मिळू लागले आहे.
भारत-पाक संबंधांमध्ये सुरू असलेल्या तणावा दरम्यान बिलावल भुट्टे यांच्या पक्षाच्या महिला खासदाराने पलवाशा मोहम्मद झाई खान यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानच्या राजकारणातून चिथावणीखोरी आणि धर्मांधतेने भरलेले विधान समोर आले आहे. बिलावल भुट्टे यांच्या पक्षाच्या महिला खासदाराने अयोध्या आणि भारताच्या अंतर्गत सार्वभौमत्वावर अतिशय वादग्रस्त विधान केले आहे. बाबरी मशिदीची पहिली विट पाकिस्तानी सेना ठेवणार, आणि पहिली अजान पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर देतील असं विधान त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत केलं आहे.
काय म्हणाल्या पलवाशा झाई खान?
पाकिस्तान सिनेटमध्ये बिलावल भट्टी यांच्या पक्षाच्या खासदार पाकिस्तानच्या संसदेत बोलतांना म्हणाल्या, “तो दिवस दूर नाही जेव्हा पाकिस्तानचा एक सैनिक बाबरी मशिदीच्या पायाची पहिली वीट रचेल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर तिथे पहिली अजान देतील. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत.”
पलवाशा झाई पुढे म्हणतात, “जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीच्या लाल किल्ल्याचा परिसर रक्ताने माखला जाईल. जर कोणी पाकिस्तानवर वाईट नजर टाकली तर त्याचे डोळे उपटले जातील. भारतीय सैन्य विभागले गेले आहे. कोणताही भारतीय शीख सैनिक… पाकिस्तानशी लढणार नाही, कारण ही गुरु नानकांची भूमी आहे.
एवढंच नाही तर,पलवाशा मोहम्मद झई खान यांनी आपल्या भाषणात भारताने दहशतवादी घोषित केलेल्या खलिस्तानी समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू यांचे कौतुक केले. त्यांनी पन्नू यांना ‘धैर्यवान आवाज’ म्हणून वर्णन केले आणि त्यांची बाजू मांडली आहे .