चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांच्या कामाची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी घेतली दखल

पाचोरा : छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती नाशिक स्थित निवासी सूक्ष्म  चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी मोहरी वरती नुकतीच साकारली होती.  याच कलाकृतीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डिंने त्यांना सन्मानित केले होते.  त्याच अनुषंगाने जगातील सर्वात मोठी London (uk) येथील नामांकित  संस्था  वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने ही ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेची दखल घेऊन सन्मानित केले आहे. त्यांना बुधवार  २८ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, मेडल प्राप्त झाले आहे.

खरं तर माझ्या आयुष्यातील हे दोन्ही क्षण खूप महत्त्वाचे आहेत असे  चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी जळगाव तरुण भारतशी बोलतांना सांगितले,  सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य वेळोवेळी मला मिळत असल्याकारणाने मी एवढे मोठे यश प्राप्त करू शकले असे ही त्यांनी सांगितले. तसेच  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य  ठाकरे यांचे हस्ते  ही ऐश्वर्या औसरकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

माझ्या आयुष्यात खूप मोठे मोठे आनंदाचे क्षण आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आशीर्वादाने आणि सहकार्याने येत आहेत, विशेषतः भारतातील पहिली सूक्ष्म चित्रकार असल्याचा मला अभिमान तर आहेच पुन्हा एकदा जागतिक पातळीवर देखील माझा वर्ल्ड बुक ऑफ  रेकॉर्डने सन्मान केल्याने माझा हा आनंद द्विगुणीत झाला असल्याचे ही चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी  सांगितले.