कुपवाडा, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे सुरक्षा दलांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेले काहीच दिवस झाले सैन्यने भारतीय सुरक्षा दलांनी चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा करून त्यांचे नापाक मनसुबे उधळून लावल्याचा हा दुसरा दिवस आहे. याआधी काल म्हणजेच मंगळवारी सुरक्षा दलांनी संयुक्त मोहिमेअंतर्गत पूंछमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.आणि एक दिवस होत नाही तो पर्यंत आता हा दुसरा पर्यंत त्याच्या कडून करण्यात आला आहे. आज सुरक्षा दलांना कुपवाडाच्या मछल सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम राबवली आणि दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, मात्र त्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना लक्ष्य केले. मारले गेलेले दहशतवादी आणि त्यांच्या संघटनेची ओळख अद्याप पटलेली नाही.
“चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून 4 एके रायफल, 6 हँडग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याचा कट रचत होते. मात्र सुरक्षा दलांनी शेवटच्या क्षणी त्यांचे मनसुबे उधळून लावले.बुधवारी पुंछमध्ये झालेल्या चकमकीनंतर जम्मू-काश्मीरच्या भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की, पूंछच्या सिंध्रा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांमधील पहिली चकमक काल रात्री 11:30 च्या सुमारास झाली त्यानंतर टेहळणी उपकरणांसह ड्रोन तैनात करण्यात आले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार होऊन आज सकाळी पुन्हा चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे कर्मचारी इतर दलांसह या मोहिमेचा भाग होते.