---Advertisement---

Pakistan Terror Attack: पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, 5 चिनी नागरिकांचा मृत्यू

by team
---Advertisement---

पाकिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 5 चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि एक स्थानिक ड्रायव्हरही मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली.

पाकिस्तानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्लेखोराने त्यांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील शांगला जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला आहे. बेशम शहराजवळ हा हल्ला झाला, ज्यात पाच चिनी नागरिक ठार झाले. सर्व मृत हे चीनचे अभियंते असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment