पाकिस्तानी सीमा हैदर बेपत्ता? वाचा सविस्तर

नवी दिल्ली, 

  सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकथेत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता सीमा हैदर सचिनच्या घरातून कुठेतरी गायब झाली आहे. कालपासून सीमा हैदरला सचिनच्या घराजवळील दुसऱ्या घरात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा दोन दिवसांपासून सचिनच्या घरी नाही. प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यासाठी सीमा आणि सचिनने हे कृत्य केल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, दोघांनाही तपास यंत्रणांनी पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

बुलंदशहरच्या अहमदगडमध्ये रविवारी गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सचिनला सोबत घेऊन छापा टाकल्याचे वृत्त आहे. लोकसेवा केंद्र चालवणाऱ्या सचिनचा नातेवाईक आणि दोन भावांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती लोकांनी दिली होती. पोलिसांच्या पथकाने जनसेवा केंद्रातून बराचसा मालही जप्त केला होता. अहमदगडमधील सचिनच्या नातेवाईकांचे व्हिडिओही समोर आले होते.

ज्यामध्ये सचिनला सोबत घेऊन पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती तो देत होता. सीमा हैदर आणि सचिनवर राबुपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याचा तपास जेवर पोलीस करत आहेत. मात्र आधार कार्ड बनावटीच्या संपूर्ण प्रकरणात दादरी पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींचे नेटवर्क हरियाणाशिवाय उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. आरोपींकडून अनेकांची बनावट आधार कार्डे जप्त करण्यात आली आहेत. या लोकांचीही चौकशी आवश्यक आहे, हे लोक कोणत्याही गुन्हेगारी कारवायांमध्येही सहभागी असू शकतात.