---Advertisement---

जळगावात पाकिस्तानी नागरिक पण…, पोलीस अधीक्षकांनी केला ‘हा’ खुलासा

---Advertisement---

जळगाव : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्यामुळे देशभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलत, पाकिस्तानी नागरिकांना स्वगृही जाण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, जळगाव शहरातही ७०० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी गजानन मालपुरे (Gajanan Malpure) यांनी केला. मात्र मालपुरे यांनी केलेले आरोप जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी फेटाळून लावले आहेत. Jalgaon latest News

काय म्हणाले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी ?

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी म्हणाले की, पाकिस्तानमधून आलेले ४०५ सिंधी नागरिक सध्या जळगावात आहेत. यातील अनेकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केलेले आहेत. यातील ९०% पाकिस्तानी सिंधी असे आहेत जे लॉन्ग टर्म विजा (एलटीव्ही) वर आहेत. एलटीव्हीवर असलेले सिंधी बांधव जळगावात आहेत. सार्क विजावर कोणताही पाकिस्तानी सिंधी बांधव नाही. तर यापूर्वीही पाकिस्तानातून काही सिंधी बांधव जळगावात येऊन येथे स्थायिक झाले आहे. अश्या सिंधी बांधवांना भारत सरकारने नागरिकत्व प्रदान केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी (Superintendent of Police Maheshwar Reddy) यांनी सांगितले.

काय आहे एलटीव्ही?

पाकिस्तानातील सिंधी बांधव भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, पाकिस्तानी सिंधी बांधवांना काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यानुसार आधी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी सिंधी बांधवांना भारतीय दूतावासाकडून सुरवातीला व्हिजिट विजा प्रदान केला जात असतो. त्यानंतर हा विजा संपण्याआधीच एलटीव्हीसाठी अर्थात लॉन्ग टर्म विजासाठी अर्ज करावा लागतो. अशात जळगाव शहरात ७०० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याचा आरोप होत आहे. मात्र, हा आरोप चुकीचा असून अश्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे कुणालाही संशय असल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. यासह चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नका. चुकीची माहिती व अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

दरम्यान, जळगावात ७०० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक असल्याचा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी गजानन मालपुरे यांनी केला असता, त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या प्रतिक्रियानंतर यू टर्न घेत, जळगावात ३७४ पाकिस्तानी नागरिक असल्याचं कुठेतरी वाचण्यात आल्याचं म्हटलं आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment