jalgaon news: जळगावकर पाणी जरा जपून वापरा

जळगाव: गेल्या तीन महिन्यापासून पावसाने ओढ दिलेली असली तरी वाघूर धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक असल्याने जळगाव शहराला किमान चार महिने तरी सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे,गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे, कोरडवाहू शेतीतील पिके आता कडक उन्हामुळे करपू लागली असल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.

तर बागायतदार शेतकरी ठिबकच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहे. मात्र विज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी असुनही ते पिकांना देतांना अडचणी येत असल्याने ही पिंकेही कशी तरी तग धरून आहेत.तर होऊ शकते पाणी कपात सप्टेंबर महिन्यात अजिंठा डोंगररांगामध्ये जोरदार पाऊस पडला नाही तर मात्र शहराच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनात बदल करावा लागु शकतो. दोन दिवसांऐवजी तीन दिवसाआड पाणी पुरवठा करता येऊ शकतो.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या पाणी टंचाईबाबतचा रोजचा अहवाल घेत आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

वाघूर धरणात 57 टक्के साठा
जळगाव शहराला वाघुर धरणातून पाणी पुरवठा होत आहे. मागील वर्षी धरण 100 टक्के भरल्याने शहराला पाण्याची टंचाई भासणार नाही. सद्यस्थितीत धरणात 57 टक्के जीवंत साठा आहे. सध्याच्या दोन दिवसाआड या रूटीनप्रमाणे जळगाव शहराला सप्टेंबर ते डिसेंबर 2023 पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.

मनपात 18 पासून प्रशासक राजवट
महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी संपत आहे. 16 ला शनिवारी सुटी तर 17 ला रविवार आहे. त्यामुळे सोमवार 18 पासून महापालिकेत प्रशासक राजवट सुरू होईल, प्रशासक पदाचा पदभार विद्यमान आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.