---Advertisement---
नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष साधारण सभा आज (दि. १३ जानेवारी) नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत उपनगराध्यक्षपदी पंकज महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी पंकज महाजन यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची साडेबारा वाजता बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
याच सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रदीप (बापू) लक्ष्मण बोडरे तर शिवसेना शिंदे गटाकडून संदीप (आबा) विष्णू पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने व जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्याने दोघेही बिनविरोध निवडून आले. यावेळी शैला व्यवहारे यांनी दुसरा अर्ज मागे घेतल्याचे पीठासन अधिकारी व नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी जाहीर केले. सभेचे कामकाज मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी पाहिले.
निवड जाहीर होताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे हो भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच नगरपरिषदेतील भाजप गटनेते लालचंद पाटील, शिवसेना शिंदे गटाच्या गटनेत्या शैला व्यवहारे व नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभेच्या सुरुवातीलाच मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी सर्व नगरसेवकांचा सत्कार केला.
सभेस सर्व पक्षांचे नगरसेवक विकास पाटील, कीर्तिकांत चौबे,चेतन बऱ्हाटे,मनोज पाटील, शेख असलमोद्दिन एजाजोद्दीन,कोमल नारखेडे, लीना महाजन,हिना बी मो रईस कासार,सय्यद वासीफ अली ,सय्यद निसार अली,शाह हनीफा बी मोहम्म खलील,सुवर्णा महाजन ,जनाबाई रंधे, शेख नसरीन बानो मुश्ताक, मोहम्मद इक्बाल शेख इब्राहीम, मण्यार कमरूनिसा सय्यद बिस्मिल्ला, मन्यार आसीफ शेख गनी शेख,भारताबाई धनगर व पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर नगरपरिषद चौकात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच भाजप–सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयापासून शहरातील प्रमुख मार्गांवर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणूक काढून विजयी आनंद साजरा केला.









