Pankaj Udhas passes away : जेष्ठ गजल गायक पंकज उधास यांचं निधन

Pankaj Udhas Death : भारतीय संगीतविश्वावर आपल्या गाण्यांनी अधिराज्य गाजवणारे आणि जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती असे गायक पंकज उदास यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्यानं संगीतविश्वावर मोठा शोकाकाळ पसरला आहे.

पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली असून त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. ८० च्या दशकांत पंकजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.पंकजींना त्यांच्या चिठ्ठी आयी है नावाच्या गझल पासून मोठी लोकप्रियता मिळाली होती. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नाम मधील त्या गझलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. इतक्या वर्षांनी देखील ती गझल कमालीची लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर दिल्लगी, फिर तेरी कहानी याद आई, चले तो कट ही जाएगहा आणि तेरे बिन नावाच्या गझलला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली होती. गझल गायिकीच्या दुनियेतील बेताज बादशहा म्हणून त्यांचे नाव घेतले जायचे. त्यांच्या निधनानंतर भारताच्या गझल गायकी विश्वात मोठी शोककळा पसरल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पंकजींचे चाहते होते. त्यांना जगभरातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

पंकजा उधास यांची गाजलेली गाणी
* चिठ्ठी आयी है * जिये तो जिय कैसे *चुपके चुपके *और आहिस्त किजिए बाते *ना कजरे की धार* आप जिनके करीब होते है* वो लडकी याद आती है* घुंगरू तुट गए* चांदनी रात मे* एक तरफ उसका घर* चांदी जैसा रंग* थोडी थोडी पिया करो* मयखाने से शराब से* दिवारो से मिलक रोना अच्छा लगता है