तरुण भारत लाईव्ह । १ जानेवारी २०२३। आगामी ९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायभूमीवरील कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतच्या उपलब्धतेवर गंभीर प्र्श्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण शुक्रवारी दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या कार अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेसह तो आयपीएललाही मुकण्याची शक्यता आहे.आयपीएल मध्ये पंत दिल्ल्ली कॅपिटल्स चे नेतृत्व करतो .
पंत हा भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता व त्याने या महिन्याच्या सुरवातीला बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका २-० ने जिंकून देण्यात मोलाचा वाट उचलला होता. गेल्या दोन वर्षात भारताच्या कसोटीत धावसंख्येत भरीव योगदान देणारा तो महत्वाचा खेळाडू ठरला आहे . सध्या पंत वर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत .पंतच्या कपाळावर दोन जखमा आहेत, उजव्या गुढघ्यातील स्नायू फाटले आहे तसेच पायाचे बोट , पाठ व उजव्या हाताचे मनगट , घोट्याला दुखापत झाली आहे. पंतची प्रकृती स्थिर आहे व त्याला कोणत्याही जीवघेण्या दुखापतीचा त्रास नाही असे रुग्णालय व बीसीसीआयने संयुक्त पत्रकात म्हटले आहे.रिषभची आई त्याच्यासोबत आहे .
पंतला दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतीलेतील. आणि जर ते गंभीर असेल तर त्याला जास्त वेळ लागू शकतो. त्याच्या दुखापतीने मूल्यमापन नन्तर केले जाऊ शकते असे एम्स-ऋषिकेश येथील क्रीडा दुखापती विभागाचे काम पहाणारे डॉ.कमर आझम म्हणाले.