आई-वडिलांनी केले ‘धर्मांतर’, अल्पवयीन मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

#image_title

आई-वडिलांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला, त्यानंतर कुटुंबातील अल्पवयीन मुलाने आई-वडिलांना पत्र लिहून घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. आई-वडिलांच्या या निर्णयामुळे अल्पवयीन मुलाला राग आला, त्यामुळे त्याने कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने कुटुंबाच्या धर्मांतराचा राग येऊन घर सोडल्यामुले ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

मुलाचे आई- वडिलांना पत्र

घर सोडण्यापूर्वी अल्पवयीन मुलाने कुटुंबीयांना एक भावनिक पत्र लिहिले. यामध्ये किशोरने लिहिले आहे की, “आई-बाबा, मला माफ करा, मी या धर्मात राहू शकत नाही. तुम्ही लोक या धर्मात आल्यानंतर मला इतके बंधन होईल हे मला माहीत नव्हते. नाहीतर मी तुम्हा लोकांना या धर्मात कधीच येऊ दिले नसते.”

याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कुटुंबीयांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे, मात्र कुटुंबाने धर्म परिवर्तनाचा पूर्णपणे इन्कार केला आहे. आई-वडिलांनी सांगितले की त्यांनी धर्म बदलला नाही, मुलगा अचानक कुठेतरी गेला आहे.

मुलाने पत्रात धर्म बदलाबाबत विचारणा केली असता कुटुंबीय निरुत्तर झाले. ते म्हणतात की आम्ही फक्त सनातन धर्म मानतो. आम्ही कोणताही धर्म बदलला नाही आणि आमचा मुलगा असाही नव्हता की तो घर सोडून जाईल.

पोलीस काय म्हणाले?

या संपूर्ण प्रकरणामध्ये कानपूरच्या सचेंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश कुमार यांनी सांगितले की, ज्या दिवशी मुलगा घरातून निघून गेला, त्या दिवशी तपासादरम्यान कुटुंबीयांनी फक्त त्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली, परंतु दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईने सांगितले की, एक चिठ्ठी देखील सापडली आहे. ज्यामध्ये घर सोडण्याचे कारण लिहिले आहे.

यानंतर सचेंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, मुलाच्या आईने सांगितले की तिने तीन महिन्यांपूर्वी पतीसोबत धर्म बदलला आहे. त्यामुळे आम्ही त्याला नवीन धर्मानुसार पूजा करायला सांगायचा, पण त्याला त्यात रस नव्हता. ते म्हणाले की, मुलाच्या आईने दिलेल्या पत्रावरून हे स्पष्ट होते की, मुलगा धर्मांतरावर खूश नव्हता.