Paris Olympics 2024 : भारतीय हॉकी संघाने मिळवलं कांस्यपदक

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय हॉकी संघाने गुरुवारी स्पेनचा 2-1 असा पराभव करत हे पदक जिंकले.

भारताने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. एकूणच, भारताचे हे ऑलिम्पिकमधील 13 वे पदक आहे. त्यापैकी 8 पदके फक्त सुवर्ण आहेत.

स्पेनविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार हरमनप्रीत सिंग. या सामन्यात त्याने दोन गोल केले. या विजयासह भारताने आपला महान गोलरक्षक पीआर श्रीजेशला ऑलिम्पिक पदकासह निरोप दिला.

भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीआर श्रीजेशने हा आपला शेवटचा सामना असल्याचे आधीच जाहीर केले होते. या विजयासह तो निवृत्त झाला आहे.