नवी दिल्ली : संसद सुरक्षाभंगाप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता संसद सुरक्षेची जबाबदारी CISF कडे देण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा असते. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिना दिवशी झालेल्या धक्कादायक प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. याच वेळी अमोल शिंदे आणि नीलम देवी या दोघांनीसंसदेच्या आवाराबाहेर “तानाशाही नही चलेगी” अशी घोषणा देत डब्यातून रंगीत धूर सोडला. पाचवा आरोपी ललित झा याने कथितरित्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
ललित झा याला पसार होण्यास मदत करणारा सहावा आरोपी महेश कुमावत याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. कट रचण्यासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून अन्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संसद सुरक्षाभंगाप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता संसद सुरक्षेची जबाबदारी CISF कडे देण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा असते. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे.