Parliament Security Breach Update : नव्या संसदेच्या काल देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. संसदेच्या सिक्युरिटीमधील त्रुटीमुळे २ जण थेट लोकसभेत घुसले होते. त्यानंतर त्यांनी तिथे स्मोक कँडल देखील फोडल्या होत्या. या घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्यामुळे लोकसभा सचिवालयातील ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रामपाल, अरविंद, विरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.