Parola : मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय : आमदार चिमणराव पाटील

Parola :   तालुक्यातील मोंढाळे प्र.ऊ. ते पिंप्री प्र.ऊ. दरम्यान बोरी नदीवर तब्बल १२ कोटी रूपयांचा भव्य पुलाचा बांधकामाचा भुमीपुजन सोहळा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या पुलाची अनेक दशकांपासुन ग्रामस्थांची मागणी होती. हे पिंप्री प्र.ऊ.गांव वसल्यापासुन या गावाला लागुन बोरी नदीचे पात्र आहे. पावसाळ्यासह दैनंदिन या गावाचा दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवत होता. नदीपात्रात पाणी आले कि, ह्या गावाचा पुर्णपणे संपर्क तुटायचा. ग्रामस्थांना दळणवळणासाठी सर्वेच मार्ग बंद व्हायचे, अशात दैनंदिन दळणवळण, आरोग्य, शिक्षण या मोठ्या समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत होते. अशात आरोग्य विषयक अनेक समस्या उद्भवत होत्या, गावातुन इतर ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अतिदक्षतेचे रूग्ण, गरोदर माता-भगिणी यांची खुप गैरसोय होत होती.

यामुळे अनेक रूग्ण देखील दगावले आहेत. परंतु ही परिस्थिती बदलावी व या ग्रामस्थांचा सर्वांगिण विकास होवुन मुख्य प्रवाहात आणण्याचा आ. चिमणराव पाटील यांचा प्रयत्न होता.  योग्य तो पाठपुरावा करून आज या पुलाचा कामासाठी १२ कोटी रूपये इतका निधी मंजुर करण्यात आला.  ग्रामस्थांची कायमची दैनंदिन समस्या दुर करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचा दोन्ही गावांचा वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

आमदार पाटील म्हणले की, मतदारसंघातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा आमचा मानस आहे. जे घटक, गांव मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आज सुरू आहे. मतदारसंघातील न भुतो न भविष्यती अशा सिंचन, पिण्यासाठी पाणी, रस्ते, पुल, इतर मुलभुत सुविधा या क्षेत्रातील कामे आज मार्गी लागली आहेत. ह्या ग्रामस्थांची पुलासाठी गेल्या कित्तेक दशकांपासुनची मागणी होती ती आज पुर्ण करतांना मला देखील मनस्वी आनंद होत असल्याची भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी शेतकी संघाचे संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, जि. प. माजी कृषि सभापती डाॕ. दिनकर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, एरंडोल पं. स. माजी सभापती ग. बा पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती दगडु पाटील, डाॕ. पी. के. पाटील, माजी संचालक भैय्यासाहेब पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डाॕ. राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष सखाराम चौधरी, माजी संचालक दास पाटील, राजेंद्र पाटील यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व ग्रामस्थ बांधव व माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.