Parola News: पारोळा येथील आई फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून एक सुप्त उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत वणी सप्तश्रुंगी माता गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषधोपचार केले जातात.
आई फाउंडेशन वैद्यकीय क्षेत्रातील कार्यात आघाडीवर आहे. विविध शिबिरे, सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ५ ते ७ एप्रिल या तीन दिवसीय शिबिरात गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे.
आई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. वैशाली नेरकर यांच्या हस्ते श्रीगणेश पुजनाने (५ एप्रिल) औषधी वाटप सुरु करण्यात आले. उंदिरखेडा रस्त्यावर असलेले आई हौस्पिटलच्या प्रांगनात हे शिबीर होत आहे. या मोफत ३ दिवसीय शिबिराचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आई फांऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले आहे. याप्रसंगी आई फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, हर्षल चौधरी, राहुल पाटील, अशोक मिस्तरी, भैय्या मिस्तरी उपस्थित होते.