Erandol : येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पारोळा व पाळधी या दोन्ही गावांना बाहेरून महामार्ग वाढविण्यात आला आहे मात्र एरंडोल शहर याला अपवाद असून या ठिकाणी गावातूनच महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे एरंडोलकरांच्या वाहतुकीचा प्रश्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर बनला आहे . यामुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसून येते.
विशेष हे की नाशिक शहरात राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामात जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे या धर्तीवर एरंडोल येथे कृष्णा हॉटेल पासून दत्त मंदिरापर्यंत जवळपास तीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल जर उभारला असता तर एरंडोल शहरा नजीकची वाहतूक सुरळीत व सुरक्षित झाली असती , दुर्दैव असे की महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही एरंडोल नजीक वाहतुकीची समस्या नागरिकांच्या दृष्टीने जीवघेणी बनली आहे. याबाबत जनमानसामध्ये संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आठवडाभरा पूर्वी कासोदा नाक्या नजीक ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील धरणगाव येथील युवकाचा नाहक बळी गेला त्यावेळी संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जेसीबीने चारी खोदल्यामुळे तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
एकंदरीत एरंडोल शहरा नजीक दोन्ही महामार्गांमुळे रहदारीची डोकेदुखी गंभीर झाली असून यावर एकमेव उपाय म्हणजे झिरी नाल्यापासून थेट धारागीर गावापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा गावाबाहेरून वडविण्यात यावा तरच चित्र बदलू शकेल. बीएसएनएल कार्यालयाजवळ एरंडोल पिंपरी हा रस्ता अंजनी थडी व गुजर थडी, चोपडा , शिरपूर या परिसराला जोडणारा एकमेव मार्ग आहे.
त्यामुळे बीएसएनएल कार्यालय जवळ अंडरपास बोगदा तयार करणे अत्यावश्यक आहे . तसेच पिंपरी रस्त्यावर एरंडोल येथील बहुसंख्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत.या ठिकाणी भीषण अपघात होऊन हे ठिकाण अपघाती स्थळ बनल्यास आश्चर्यवाटू नये. तसेच कासोदा नाक्या नजीक अंडरपास किंवा मग गोल सर्कल किंवा गोल सर्कल उभारण्याली तरच अपघात टाळले जाऊ शकतात अन्यथा या ठिकाणी अपघातांचे प्रमाण होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.
नंदगाव फाट्या नजीक महामार्गावर असलेला पूल रुंद करून खालून वाहतुकीसाठी खुला केला तर नंदगाव रस्त्याला लागून असलेल्या शेतीसाठी जा करू शकतात.
एरंडोल बस स्थानक नाशिक गटारीसाठी मोठा खड्डा जवळपास दोन महिन्यापासून खोदून ठेवला आहे परंतु गटारीचे बांधकाम होत नाही तसेच बस स्थानकापासून ते नांदगाव फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारी न झाल्यास महामार्गावरील पावसाचे पाणी परिसरातील इमारतींमध्ये शिरल्याशिवाय राहणार नाही.
तिवारी व्यापारी संकुलापासून नंदगाव फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारी व इतर सणसाधनांसह समांतर रस्ते होण्याबाबत कोणाचा विरोध तर नाही ना एरंडोलच्या विकास कामाला आतून विरोध करणारा झारितला शुक्राचार्य कोण याबाबत जनमानसात चर्चा होत आहे. एकंदरीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यासोबत समांतर रस्ते त्यावर प्रवाशांची सुरक्षितता निर्माण होणे अत्यावश्यक आहे
समांतर रस्त्यांचा प्रश्न व वाहतुकीच्या इतर समस्यांबाबत लवकरच एरंडोल येथे सर्वपक्षीय कृती समिती स्थापन होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.