---Advertisement---

नागपूरमध्ये पतंजली हर्बल पार्कचे उद्घाटन, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान!

by team
---Advertisement---

Patanjali Foods: नागपूर येथे पतंजली फूड अँड हर्बल पार्कचे आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली.

यावेळी पतंजली आयुर्वेदाचे सह-संस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी उचललेल्या पावलांची माहिती दिली. तसेच या प्रदेशातील फळांचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलही सांगितले.

शेतकऱ्यांसाठी वरदान

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पतंजलीला मिहानमध्ये मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करा अशी विनंती केली होती. विदर्भात 10 हजाराहून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याचं कारण शेतकरी सोयाबीन, कापूस आणि संत्रा पीक घेतात. मात्र योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. पण आता तसं होणार नाही. जो संत्रा 3 ते 4 रुपयांनी विकला जातो. तोच संत्रा पतंजलीकडून 18 रुपयांनी खरेदी केला जाणार आहे. तशी घोषणाच पतंजलीने केली आहे. त्यामुळे चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळणार आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.

फूड पार्कवर रामदेव बाबांचे भाष्य

रामदेव बाबा यांनी पतंजली फूड पार्क आणि त्याच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “या फूड पार्कची क्षमता दररोज ८०० टन आहे. यातून नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार केला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.”त्यांनी पुढे सांगितले की, “संत्र्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाची रोपे विकसित केली जातील. विदर्भातील संत्र्यांना देश-विदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जातील.”रामदेव बाबा “जय जवान, जय किसान, जय मिहान” अशा घोषणा देखील दिल्या आणि महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”असे वाचनही त्यांनी दिले

इतर फळांवरही येथे प्रक्रिया केली जाईल

दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक खूप मोठा औषधी वनस्पती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. संत्र्यांचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे, कारण बाजारात विकली जात नसलेली संत्री आता येथे खरेदी केली जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. इतर फळांवर प्रक्रिया देखील येथे केली जाईल. शीतगृहांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. संत्र्यांचे योग्य उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी एक नवीन रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment