चोपडा : येथील अॅक्सीस बँकेच्या बाहेर बँकेतर्फे ग्राहकांना पैसे डिपॉझिट करता यावे याकरिता रिसायकलर मशीन लावण्यात आले आहे. या मशीनद्वारे ५०० रुपयांच्या अडीच हजार किमतीच्या ५ नकली नोटांचा भरणा करण्यात आला आहे. वकील नोटांचा भरणा करणाऱ्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, अॅक्सीस बँकेच्या बाहेर बँकेचे रिसायकलर गोकुळ सुखदेव सोनवणे (रा. विदयाविहार कॉलनी) याने मशीनव्दारे ५०० रु दराचे एकुण ४० नोटा अशी एकूण रक्कम २० हजार रुपये डिपोझिट केले. त्यापैकी १७,५००/- रु इतकी रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मॅसेज त्याला आला. उर्वरीत २५००/- रु रक्कम खात्यात जमा का झाली नाही याबाबत त्याने फिर्यादीकडे विचारणा केली. फिर्यादीने आरोपी गोकुळ सोनवणे यास सी.एम.एस.चे नियुक्त लोक रिसायकलर मशीन उघडल्यावर त्यावेळी नक्की काय झाले आहे ते पाहुन तुम्हाला सांगता येईल असे सांगीतले. यानंतर गोकुळ सोनवणे ते तेथुन निघून गेला. नंतर दुसऱ्या दिवशी १८ मे २०२४ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सीएमएस या कंपनीचे कर्मचारी ललीत पाटील, मच्छिद्र कोळी हे बँकेत आले. त्यांनी रिसायक्लर मशीनमध्ये जमा झालेली रक्कम काढण्यासाठी उघडुन पाहीले असता त्या मशीनमध्ये असलेल्या बनावट नोटांच्या बकेटमध्ये ५०० रु च्या ५ नोटा (एकुण रक्कम २५०० रु) बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा काउंटर स्लिपमध्ये नमुद अकाउंट क्र. ९१४०१००३७१८५३५९ हा गोकुळ सोनवणे याचा असल्याची खात्री झाली. त्या बनावट नोटा असल्याचे माहित असुनही त्याने जाणीवपुर्वक त्या बनावट/नकली चलनी नोटा खऱ्या असल्याचे भासवुन बैंक खात्यात जमा करुन चलनात आणल्या म्हणुन त्याच्या विरुद्ध हर्षल जयविलास जैन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अति. प्रभार पोनि कावेरी कमलाकर चोपडा ग्रामिण पो.स्टे.सपोनि एकनाथ भिसे चोपडा शहर पोस्टे हे अधिक तपास करीत आहे.