जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही

जळगाव : सरकार शेतकरी, युवक, महिला यांच्यासह विकासाचे प्रश्न सोडवण्याबाबत गंभीर नाही. त्यांना फक्त सत्ता काबिज करणे, निरपराध जनतेवर लाठीचार्ज करणे आणि निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मराठा व धनगर आरक्ष्ाणाचा मुद्दा रेटणे यातच सरकारला रस असल्याचा आरोप शनिवारी राष्ट्रवादी कांॅग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी केला.राष्ट्रवादीचे कांॅग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे 5 रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आले असता राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष्ा अध्यक्ष्ा रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर , पालघरचे आमदार चंद्रकांत भुसारा, वाल्मिक पाटील, अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्ष्ाा मंगला पाटील, युवकचे रिंकू चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार पवार म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काम जोरात आहे. शरदराव पवार यांच्या सभेसाठी अनेकांच्या भेटी घेत आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादीत फुट पडली किंवा डॅमेज कंट्रोल करण्याचा विषय आमचा नाही, तो त्या गटाचा आहे.

दुष्काळ जाहीर करावा

सध्या पावसाने ओढ घेतल्याने दुष्काळजन्य स्थिती असल्याने सरकारने लवकर दुष्काळ जाहिर करुन त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणही त्यांनी यावेळी केली.
जालना लाठीमारचा निषेध जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा त्यांनी निषेध नोंदवला. आंदोलन शांततेत सुरू असतांना पोलिसांनी बळाचा वापर करून आदोलकांवर लाठीचार्ज केला. यात महिला व मुलांनाही लाठी मारून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे चिरडलेल्या आंदोलकांनी प्रतिउत्तर म्हणून दगडफेक केली. पोलिसांनी गृहमंत्र्याच्या आदेशावरुन हे करण्यात आले आहे. कारण तेथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. तोपर्यंत हे आंदोलन चालू नये म्हणून लाठीचार्ज केला असल्याचेही आमदार पवार म्हणाले. या अमानवी घटनेस गृहमंत्री जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जळगावला तीन मंत्री तरीही रस्ते खड्डेमयच
जळगावला तीन मंत्री आहे. विकासासाठी तिकडे गेल्याचे सांगत असतांना मात्र जळगावातील खड्डेमय रस्त्यांची स्थिती अनुभवली. हाच का तो विकास असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.
मोंदींनी कोठून लढावे तो त्यांचा प्रश्न पंतप्रधान लोकसभेची निवडणूक पुण्यातून लढणार असल्याचे वृत्त आहे. त्यावर आमदार रोहित पवार म्हणाले की, त्यांनी कोठून लढावे हा त्यांचा विषय आहे. त्याचा आम्हास फरक पडणार नाही.

मराठा, धनगर आरक्ष्ाणाबाबत सरकारची चुप्पी
सरकारला खरे तर मराठा व धनगर आरक्ष्ाण द्यायचे नाही. जेव्हा ते विरोधात होते तेव्हा सत्ता द्या दोन महिन्यात आरक्ष्ाण देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.
आता सत्ता येवून दीड वर्ष झाले आहे. आरक्ष्ाण दिलेले नाही. खरे याबाबत लोकसभेत निर्णय घेणे गरजेचे आहे. परंतू भाजपला ते द्यायचे नाही, असेही ते म्हणाले.

स्पर्धा परीक्ष्ोसह नोकरीचे शुल्क कमी करावे
स्पर्धा परीक्ष्ोसह सरकारी नोकरीसाठीच्ो आवेदन शुल्क हे 1 हजार रुपये आहे. एक उमेदवार एकाचवेळी अनेक ठिकाणी अर्ज टाकत असतो. ही त्याची आर्थिक लूट आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठावला होता. परंतु शासनाने शुल्क कमी केले नाही.

अजित पवाराबाबत बोलणे टाळले
अजित पवारांवर घोटाळ्याचे आरोप केले गेले. मात्र फुटून सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांचे नाव ईडीच्या चौकशीतून वगळण्यात आले याबाबत विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे सांगत रोहित पवार यांनी बोलणे टाळले.