नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. मद्य धोरणाच्या वादात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची गृहमंत्री अमित शहा यांनी खरडपट्टी काढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा खरपूस समाचार घेत म्हटले की, लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना लोकांना ‘दारू घोटाळा’ आठवेल. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. दिल्लीतील सात जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. सीएम केजरीवाल यांना शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जून रोजी शरण येण्यास सांगण्यात आले आहे.
दारू घोटाळा लोकांना आठवेल…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या मुलाखतीत सीएम केजरीवाल यांच्याशी संबंधित एका प्रश्नावर म्हणाले, “मतदार म्हणून मला विश्वास आहे की ते जिथे प्रचाराला जातील तिथे लोकांना दारू घोटाळा आठवेल. पंजाबमध्येही, जेव्हा लोक केजरीवालांना पाहतील तेव्हा त्यांना त्यांच्यासमोर मोठ्या बाटल्या दिसतील. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की सीएम केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळाल्याने विरोधी इंडिया आघाडीला काही फायदा होईल असे मला वाटत नाही.