---Advertisement---

Nandurbar News : भालेर येथील मंदिर परिसरातून मद्य व मांस विक्री कायमस्वरूपी बंद करा, ग्रामस्थांची मागणी

by team
---Advertisement---

नंदुरबार : तालुक्यातील भालेर येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरातील मद्य व मास विक्री कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी ग्रामविकास अधिकारी  सुरेश पंडित पाटील यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. 

काय म्हटले निवेदनात ?

भालेर येथील  समस्त ग्रामस्थ आपणास निदर्शनास आणून देतो की भालेर बस स्टॅन्ड  परिसरात  तसेच भालेर गावत  मास विक्रीचे दुकान अवैधपणे चालू आहेत व याच परिसरात प्रभू श्री रामचंद्रांचे म्हणजेच काकेश्वर महाराजांचे व कुलस्वामिनी आई धनाई पुनाई मातेचे मंदिर आहे.  दिनांक ९ मार्च २००४ रोजी  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. एम्. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या खंडपीठाने ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांत शासनाने आणलेली ‘मांस-मद्य’ यांवरील बंदी कायम ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन म्हटले आहे, ‘या तीर्थक्षेत्री कुंभमेळे होतात. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक तेथे धार्मिक उपासना करण्यासाठी येतात. या कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना तीर्थक्षेत्राशी जोडलेल्या आहेत. त्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.  धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी ‘मांस-मद्य’ बंदी योग्य असल्याचेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हाच नियम सर्वच धार्मिक स्थळांना लागू होतो.

भालेर गावातील देवीचे मंदिर असल्याने नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे व येणाऱ्या काळात श्री रामनवमीच्या दिवशी मोठी यात्रा भरणार आहे या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने आपली हजेरी लावतात त्यावेळी असे मास विक्रीचे दुकान उघड्यावर सुरू असल्यास धार्मिक भावनांचा अनादर होतो तरी ही मास विक्रीची दुकाने त्वरित बंद करावे व अवैध मास व मद्य   कायमस्वरूपी बंद कराव्यात तसेच येणारे श्रीराम नवमीच्या निमित्ताने यात्रोत्सवात अनेक गैर प्रकार चालतात त्या गैरप्रकारांवर आळा घालण्याचे नियोजन ही करण्यात यावे. असे  ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

भारतीय संविधान कलम २५ नुसार सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. यानुसार हिंदु धर्मात मद्य आणि मांस हिंदूंच्या धार्मिक स्थळी विक्री करण्यास अनुमती देणे, ही हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय. काही समाजकंटक हेतूतः मंदिर परिसरात बेकायदेशीपणे मद्य-मांस विक्री करतात, अशांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कलम २९९ अ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.या प्रकरणी त्वरित कारवाई करून कायमस्वरूपी मद्य व मास विक्रीचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे.  अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे

याप्रसंगी पवन पाटील, बादल पाटील , हेमंत पाटील, स्वप्निल पाटील, वैभव पाटील, कमलेश बागुल, भावनेश पाटील, सौरव पाटील, राज पाटील, मेहुल पाटील, धिरज बोरसे आदी उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment