---Advertisement---

दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरेंना भोवणार ? मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

by team
---Advertisement---

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

सतीश सालियन यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ‘उबाठा’चे आमदार आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरीपेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोर्या  आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश सालियन यांनी न्यायालयाकडे केली आहे. यासोबतच त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही केली आहे.

न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सतीश सालियन यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सतीश सालियन यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे आणि पोलिसांना त्यांना त्रास देऊ नये अशी विनंती केली आहे.

त्याचबरोबर भाजप आमदार नितेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ही हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. पहिल्या दिवसापासूनच मी त्या लोकांची चौकशी करण्याची मागणी केली होती, ज्यांची नावे सतीश सालियन यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेत घेतली आहेत. आता हे स्पष्ट झाले आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी काय पावले उचलली होती.

राणे पुढे म्हणाले की, आता तपासादरम्यान कोणत्या प्रकारचा दबाव आणला गेला हे समोर येईल. त्यांनी असा आरोप केला की दिशा सालियनच्या वडिलांनी सामूहिक अत्याचार आणि हत्येचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढते. आता या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होऊ शकते आणि हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेतही उपस्थित केला जाऊ शकतो. दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आता पुन्हा गुंतागुंतीचे होत चालले आहे आणि आदित्य ठाकरेंसाठी अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment