कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) अंतर्गत करोडो ग्राहकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता EPF खातेधारकांना आपल्या पीएफ (PF) खात्यातील पैसे काढताना कोणतीही अडचण येणार नाही. सरकार लवकरच अशी प्रणाली सुरू करणार आहे, जिच्या मदतीने कर्मचारी त्यांच्या PF खात्यातील पैसे थेट UPI द्वारे काढू शकतील. त्यामुळे पैसे मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.
UPI द्वारे पीएफ पैसे काढण्याचा मार्ग मोकळा
मिळालेल्या माहितीनुसार, EPFO ने या संदर्भात एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. पुढील 2-3 महिन्यांत PF काढण्याची प्रक्रिया UPI प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : Jalgaon News: खुशखबर ! आता थेट समस्यांबाबत नागरिकांना ‘ऑनलाईन’ साधता येईल जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क
यामुळे काय बदल होणार?
EPFO ग्राहकांना आता डिजिटल वॉलेटद्वारे किंवा UPI माध्यमातून थेट पैसे काढता येतील.परदेशी कामगार, लहान गावांतील कर्मचारी किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या सभासदांसाठी ही सुविधा मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरेल.EPFO, कामगार मंत्रालय, बँका आणि RBI एकत्रितपणे या बदलावर काम करत आहेत.डिजिटल प्रणाली अधिक वेगवान आणि पारदर्शक केली जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही.
UPI जोडल्याने काय फायदे होतील?
पैसे त्वरित हस्तांतरण – PF पैसे काढण्याचा कालावधी कमी होईल.
सुलभ प्रक्रिया – अर्ज मंजूर होताच UPI द्वारे पैसे थेट खात्यात जमा होतील.
दुर्गम भागातील ग्राहकांना मदत – बँकेत जाण्याची गरज भासणार नाही, थेट मोबाईलवर पैसे मिळतील.
पेपरलेस व्यवहार – डिजिटल माध्यमातून पैसे ट्रान्सफर होणार असल्याने प्रक्रिया सुलभ होईल.
हेही वाचा : दुर्दैवी! आई मिसळ घेऊन परतली अन् दिसला मुलाचा मृतदेह, रजेवर आलेल्या जवानाची आत्महत्या
कधी होईल अंमलबजावणी?
सध्या EPFO आणि NPCI यांच्यात अंतिम चर्चा सुरू आहे. अंदाजे 2 ते 3 महिन्यांत ही सुविधा लागू होऊ शकते. यासाठी सरकार EPFO प्रणालीमध्ये मोठे डिजिटल बदल करण्याच्या तयारीत आहे.
सरकार आणि EPFO व्यवस्थापन डिजिटल प्रणाली अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. नवीन UPI सुविधा लागू झाल्यानंतर कर्मचारी भविष्य निधीचे पैसे काढणे सोपे, वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.PF ग्राहकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी असून, लवकरच या सुविधेचा लाभ सर्वांना मिळणार आहे!